Last Updated: Sunday, October 6, 2013, 10:14
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीआसाराम बापूंच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. सुरत मधील दोघा बहिणींनी आसाराम बापू आणि त्यांचा पूत्र नारायण साई यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलाय.
या प्रकरणात आसाराम बापूंच्या पत्नीचाही सहभाग असल्याचा आरोप या दोघा बहिणींनी केलाय. या बहिणींपैकी मोठ्या बहिणीवर आसाराम बापूंनी बलात्कार केला होता तर लहान बहिणीवर नारायण साईने बलात्कार केला होता अशी तक्रार या दोघा बहिणींनी केली आहे. दहा वर्षांपूर्वी ही बलात्काराची घटना घडली होती मात्र भीती पोटी त्यांनी याची कोठेही वाच्यता केली नव्हती असं म्हटलंय.
आसाराम बापू यांनी जोधपूरमधील आश्रमात एका अल्पवयीन मुलींनं आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय. त्यासंबंधी १९ ऑगस्टला तिनं आपल्या वडिलांसोबत जावून दिल्लीतल्या कमलानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यांनंतर आसाराम बापू विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. सध्या आसाराम बापूंचा जामिन अर्ज फेटाळल्यामुळे ते जेलमध्येच आहेत
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 6, 2013, 10:14