आसाराम बापूची सावज टिपायची पद्धत- टॉर्चचा प्रकाश किंवा फळ फेकून!,Son of asarambapu narayansai aide mahendra chawla reve

आसाराम बापूची सावज टिपायची पद्धत...

आसाराम बापूची सावज टिपायची पद्धत...
www.24taas.com

अल्पावयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या् आरोपात सध्या तुरुंगात असलेल्या आसाराम बापूबद्दल सेवकानंतर आता एका माजी सहकाऱ्यानेही काही खळबळजनक खुलासे केले आहेत. या सहकाऱ्याने आसाराम बापूंच्या आश्रमात मागील बऱ्याच कालावधीपासून हे गैरव्यवहार होत आहेत, असे म्हटलंय.

महेंद्र चावला नावाचा हा इसम आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई याचे स्वीय सहायक म्हणून काम करीत असे. महेंद्र चावला यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काही गंभीर मुद्दांवर प्रकाश टाकला आहे.

“मुली निवडण्यासाठी एक खास पद्धतीचा अवलंब आसाराम बापू करीत असे. बापू टॉर्चचा प्रकाश टाकून किंवा फळ फेकून सावज निवडायचे. टॉर्चचा प्रकाश किंवा फळ १५ ते ३५ वयोगटातील मुली किंवा महिलांवर फेकण्यात येत असे ही त्यांच्या चेल्यांना समजण्यासाठीची खूण होती.

त्यानंतर त्या मुलीला आसारामपर्यंत कसे पोहोचवावे, यासाठी चेले कामाला लागत.” महेंद्र चावला यांनी दिलेल्यात मुलाखतीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

“आसाराम बापूंवर लावण्‍यात आलेले सर्व आरोप खरे आहेत. यात काहीही नवीन नाही. आश्रमात दिर्घ कालावधीपासून असे काम होत आहे. आतापर्यंत पोलिस आणि सरकार आसाराम बापूंच्या दबावाखाली होते. विरोध करणाऱ्याला धाकाने गप्प बसविण्यात येत होते.

आसाराम बापूंचे समर्थक विरोध करणाऱ्याच्यार घरासमोर गोळा होऊन त्याला त्रास देत असत. त्यामुळे भीतीने कोणीही विरोध करत नव्हते. महेंद्र चावला यांनी जीवाला धोका असल्याचेही सांगितले. यापूर्वी नारायण साईने आपल्याला मारहाण केल्याचेही ते म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 6, 2013, 15:25


comments powered by Disqus