बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यात 7 ठार, assam 7 killed in fresh bodoland violence in kokrajhar and baska

आसाममध्ये बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यात 7 ठार

आसाममध्ये बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यात 7 ठार
www.24taas.com, झी मीडिया, गुवाहाटी

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सात नागरिक ठार झालेत. कोक्राझार जिल्ह्यातील बालपाडा मध्ये हा गोळीबार करण्यात आलाय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे.

कालही राज्यातील बक्सा जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी एका कुटुंबातील तिघांजणांची गोळ्या घालून हत्या केली होती. बक्सा आणि कोक्राझार जिल्ह्यांमध्ये सध्या लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केलीये.

कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातील दोन गावांमध्ये ही घटना घडली. या हल्ल्याचा लोकसभा निवडणूकीशी कोणत्यारही प्रकारचा संबंध नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

एका राजकीय पक्षाच्या बाजूने मतदान न केल्यामुळे बोडो अतिरेक्यांनी या दोन गावांतील नागरिकांना लक्ष्य केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. बक्सा व कोक्राझार जिल्ह्यांमध्ये लष्कर व पोलिसांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू
आहे.

गुरूवारी राज्यातील बक्सा जिल्ह्यामध्ये बोडो अतिरेक्यांनी एका कुटुंबातील तिघा जणांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर मध्यरात्री कोक्राझार जिल्ह्यात ७ जणांची हत्या करण्यात आली. या दोन्ही हल्ल्यात ए.के बंदुका वापरल्या गेल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 2, 2014, 13:26


comments powered by Disqus