`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार `EL NINO` will effect on Indian economy

`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार

`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

देशात पावसाच्या कमतरतेमुळे देशातील उत्पन्न म्हणजेच देशातील `जीडीपी`मध्ये १.७५ टक्के घसरण होईल. अंदाजे १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात ज्या प्रदेशात शेतीसाठी सुपीक जमीन आहे. तो भाग कमी पावसाच्या प्रदेशात येतोय. भारतात पावसाचं प्रमाण १ टक्क्यांनी जर का कमी झालं. तरी देशाच्या आर्थिक उत्पन्नांत म्हणजेच जीडीपीमध्ये ०.३५ इतकी घट होते.

भारतातील अर्थव्यवस्था ही शेतीवर चांगल्याच प्रमाणे अवलंबून आहे. या कारणाने जर का पाऊस कमी होत असेल, तर पिकांचं उत्पन्न कमी प्रमाणात होईल. पण जर शेतीमध्ये कमी पावसात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न झाला. तर कच्चा माल तयार होऊन त्याचा औद्योगीक क्षेत्रावर वाईट परीणाम होणार हे निश्चित आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 18:27


comments powered by Disqus