Last Updated: Sunday, October 27, 2013, 19:44
www.24taas.com, झी मीडिया, पाटणापाटण्यातमधे झालेल्या स्फोटांमागे बिहारमधलं सामाजिक वातावरण बिघडवण्याचं षडयंत्र असल्याचा संशय मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी व्यक्त केलाय. भाजपच्या हुंकार रॅलीच्या मैदानात आज रॅली सुरू होण्याआधी ५ स्फोट झाले तर एक स्फोट पाटणा रेल्वे स्थानकात झाला.
या स्फोटात ५ ठार आणि ७२ जखमी झालेत. दरम्यान या स्फोटांप्रकरणी ३ संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. स्फोटांनंतर झालेल्या तपासणी दरम्यान अजून ४ जिवंत बाँब मिळाले. ते तातडीने निकामी करण्यात आले. हे बाँब निकामी करताना आणखी एक स्फोट झाला. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झालाय.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत तर जखमींच्या उपचारांचा खर्च बिहार सरकारने जाहीर केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 27, 2013, 19:44