मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, ३ ठारBomb blast near Manipur CM’s residence, 3 kil

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, ३ ठार

मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट, ३ ठार
www.24taas.com, वृत्तसंस्था, इंफाळ

मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर यीसकुल भागात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात तीनजण ठार आणि सातजण जखमी झाले आहेत. जखमींना आरआयएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय.

टायमर लावून आयईडीचा स्फोट करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी बस स्टॉपवर रस्त्याच्याकडेला बॉम्ब ठेवण्यात आला होता. स्फोट झाला तेव्हा स्फोटात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. तर २ जखमींचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

स्फोटाचं ठिकाण हे मुख्यमंत्री ओकराम इबोबी यांच्या निवासस्थानापासून आणि मणिपूर पोलीस मुख्यालयापासून १ किलोमीटर अंतरावरच आहे. स्फोटानंतर लगेचच वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आलीय.

याआधी कालही मुख्यमंत्र्यांच्या घरापासून उत्तरेला एक किलोमीटर अंतरावर ख्वैरमबंद बाजारात भैरोदान शाळेजवळ सकाळी सहा वाजता बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात पाचजण ठार झाले होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 30, 2013, 10:48


comments powered by Disqus