मोदींच्या ‘हुंकारा’आधी पाटण्यात साखळी बॉम्बस्फोटSerial blasts in Patna ahead of Narendra Modi`s `Hun

मोदींच्या ‘हुंकारा’आधी पाटण्यात साखळी बॉम्बस्फोट

मोदींच्या ‘हुंकारा’आधी पाटण्यात साखळी बॉम्बस्फोट
www.24taas.com, झी मीडिया, पाटणा

एकामागून एक आठ साखळी स्फोटांनी पाटणा हादरलंय. पहिला स्फोट पाटणा रेल्वे स्टेशनवर दोन आणि गांधी मैदानाजवळ सहा स्फोट झालेत. याच गांधी मैदानावर मोदींची सभा होणार आहे.

प्लॅटफॉर्म नंबर १० वरील शौचालयात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय. स्फोटानंतर बॉम्बविरोधक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी केलीय. टायमरनं हा स्फोट केल्याचं आता उघड होतंय. घटनास्थळावरुन ९ जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आलेत.

गृहमंत्रालयानं या स्फोटांप्रकरणी बिहार सरकारकडून रिपोर्ट मागितलाय. या स्फोटांचा तपास करण्यासाठी एनआयएची टीम रवाना होणार आहे.

पहिला स्फोट पाटणा रेल्वे स्टेशनवर झाला तर दुसरा स्फोट गांधी मैदानापासून जवळच असलेल्या एलफिस्टन सिनेमा हॉल जवळ घडवून आणण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन आणि सिनेमा हॉलजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटांची तीव्रता कमी असली तरी या स्फोटातील एका जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसंच अन्य सहा जखमींवर उपचार सुरू आहे.

भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्र नरेंद्र मोदी यांची आज पाटण्यात सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर या घटनेकडे गांभीर्यानं पाहिले जात आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 27, 2013, 13:05


comments powered by Disqus