डॉ. दाभोलकर हत्या : `सनातन`चा संशयित ताब्यात suspect from Sanatan arrested for Dr. Dabholkar`s killing

डॉ. दाभोलकर हत्या : `सनातन`चा संशयित ताब्यात

डॉ. दाभोलकर हत्या : `सनातन`चा संशयित ताब्यात
www.24taas.com, झी मीडिया, पणजी

डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला पुणे पोलिसांनी गोव्यातून ताब्यात घेतलंय. संदीप शिंदे असं या संशयिताचं नाव असून तो सनातन संस्थेचा साधक आहे.

संदीपला गोव्यातल्या सनातन आश्रमातून ताब्यात घेण्यात आलंय. दाभोलकरांची हत्या होऊन ९ दिवस उलटले तरी पुणे पोलिसांना तपासाची दिशा सापडत नसल्याचा आरोप होत होता. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.

दुसरीक़डे मात्र सनातन संस्थेनं आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याला ताब्यात घेतलेलं नसल्याचा खुलासा केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 28, 2013, 22:19


comments powered by Disqus