डॉ. दाभोलकर हत्या सीसीटीव्ही फूटेज पाठवणार लंडनला , Narendra Dabholkar killed

डॉ. दाभोलकर हत्या सीसीटीव्ही फूटेज पाठवणार लंडनला

डॉ. दाभोलकर हत्या सीसीटीव्ही फूटेज पाठवणार लंडनला
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणंचं सीसीटीव्ही फूटेज आता अधिक तपासणीसाठी लंडनला पाठवले जाणार आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शहाजी साळुंखे यांनी ही माहिती दिलीय.

दाभोलकर खून प्रकरणी पोलिसांनी गोव्यातून संदीप शिंदे या सनातनच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले होते. मात्र त्याच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले.

केवळ स्केचच्या साम्यामुळे शिंदेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासात कोणतीही विशेष प्रगती झाली नसल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान, दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला अटक झाली नसल्याचा खुलासा संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय. संस्था पोलिसांना तपासात पूर्णपणे सहकार्य करत असून आमचं निर्दोषत्व सिद्ध होईल, अशी प्रतिक्रीया वर्तक यांनी दिली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 30, 2013, 08:40


comments powered by Disqus