डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे RSS चे विचार- ठाकरे RSS`s thought process behind Dr. Dabholkar`s Assassination

डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे RSS चे विचार- ठाकरे

डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे RSS चे विचार- ठाकरे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘आरएसएस’च्या विचारांचा परिपाक म्हणजे नरेंद्र दाभोळकरांची हत्या असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय. आरएसएसने भाजपचा मुखवटा घातला असून गांधींची हत्या करणा-यांना भारतीय जनतेनं दारातही उभं केलं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.

2014 मध्ये होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी काँग्रेसनं सुरु केली आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात काँग्रेसनं राज्यातल्या काँग्रेस पदाधिका-यांसाठी व्हिजन 2014 हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात बोलताना माणिकराव ठाकरेंनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येला अप्रत्यक्षपणे भाजपला जबाबदार धरलं आहे. या वेळी बोलताना नारायण राणे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांना थापाड्या म्हणत हिणवलं.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपासून काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार, खासदार या कार्यक्रमास उपस्थित होते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं केलेली कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनजागर यात्रा राबवत आहे. याअंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे साडेतीन हजार सभांचे आयोजन करण्यात आलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 21, 2013, 20:48


comments powered by Disqus