Last Updated: Friday, August 23, 2013, 11:11
www.24taas.com झी मीडिया, पुणेअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची गोळी मारून हत्या करणाऱ्यांच्या मोटरसाईकलचा तपास लागला आहे, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे.
२० ऑगस्टला दाभोलकर ओंकारेश्वर मंदिराजवळ सकाळी मॉनिंग वॉकसाठी निघाले होते. तेव्हा अज्ञात मारेकरांनी गोळीमारून त्यांची हत्या केली. पोलीस आधिकाऱ्यांनी असे सांगितले की, मारेकरांच्या शोधासाठी पोलिसांची काही पथके ठाणे, सातारा आणि सांगली या ठिकाणी तपासाकरिता पाठवली आहेत. सातारा हे दाभोलकरांचे मूळ गाव आहे.
पोलिसांनी मारेकऱ्यांच्या मोटरसायकलशी मिळत्या जुळत्या नंबरच्या ४९ मोटरसायकलिंचा तपास केला आहे. या तपासातून मोटरसायकलबाबत काही महत्तवाच्या गोष्टींची माहीती मिळाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 23, 2013, 11:04