Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:27
www.24taas, वृत्तसंस्था, सिंगापूर `तो` आपल्या तरण्या प्रेयसीवर लाईन मारतो म्हणून म्हणून एका ८० वर्षाच्या वृद्धानं ६५ वर्षीय वृद्धावर सुरा आणि कात्रीनं प्राणघातक हल्ला केला. ही घटना सिंगापूरमध्ये घडलीय.
८० वर्षीय लिम साँग चोंग हा एका चर्चेमध्ये काम करतो तर ६५ वर्षीय चेंग यी मून हा लिमच्या ४८ वर्षीय प्रेयसीचा घरमालक आहे. आपल्या प्रेयसीसोबत चेंगचे प्रेमसंबंध असल्याचा संशय लिमला होता. त्यावरून या दोघांचं चर्चमध्येच जोरदार भांडण झालं.
यावेळी झालेल्या भांडणामध्ये लिमनं चेंगवर छत्री, सुरा, कात्री अशा हाताला लागतील त्या वस्तूंनी हल्ला चढवला. चेंगनंही मग त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि अग्नीशमनाचा सिलिंडर म्हाताऱ्या-दुबळ्या प्रतिस्पर्ध्यावर फेकला. मात्र, या घनघोर युद्धामध्ये एकमेकांवर फेकण्यात आलेली कोणतीही अस्त्रे प्रतिस्पर्ध्याला इजा करु शकली नाहीत.
अखेर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सिंगापूरच्या या दोन वयोवृद्ध योद्ध्यांना एकमेकांपासून दूर केलं. लिम याला चेंगवर हल्ला केल्याप्रकरणी तीन हजार डॉलर्सचा दंड आणि एका दिवसाची कोठडीही सुनावण्यात आली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 5, 2014, 11:27