अखेर बंगल्यानं उलगडलं रहस्य... - Marathi News 24taas.com

अखेर बंगल्यानं उलगडलं रहस्य...

www.24taas.com, इगतपुरी 
 
अभिनेत्री लैला खानच्या हत्येचं गूढ आता उकललं आहे. काल तिच्या इगतपुरीच्या बंगल्याच्या परिसरात सहा सांगाडे सापडल्यानंतर आता तिच्या बंगल्यात चाकू आणि लोखंडी रॉड सापडलेत. याच हत्यारांनी लैला आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या या हत्यारांनी निर्घृणपणे करण्यात आल्याचं समोर येतंय.
 
दरम्यान, मुंबई पोलिसांची टीम आता नाशिकहून मुंबईत परतली असून ते सहा सांगाडे लैला आणि कुटुंबीयांचेच आहेत का? याचा छडा ते लावणार आहेत. परवेझ टाकने दिलेल्या माहितीनुसार पोलीसांना या खूनाचा उलगडा करण्यास मदत झाली. मंगळवारी बंगल्याच्या टॉयलेट सेफ्टी टँकमध्ये सहा सांगाडे आणि कवट्या सापडल्या. याच ठिकाणी कपड्यांनी भरलेली पुरून ठेवलेली बॅगही सापडली. तर आता ज्या हत्यारांनी या हत्या करण्यात आल्या ती हत्यारंही पोलिसांच्या हाती लागलीत. हेच पुरावे दहशतवादाशी जोडलेले आणखी काही खुलासे समोर आणणार आहेत. आता फॉरेंसिक आणि अनॉटॉमी रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

First Published: Wednesday, July 11, 2012, 14:23


comments powered by Disqus