छगन भुजबळ दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर

Last Updated: Sunday, March 3, 2013, 23:50

दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आलेल्या छगन भुजबळांनी अधिका-यांना चांगलंच धारेवर धरलं...यावेळी त्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला..

इगतपुरीतील फार्म हाऊसचं रहस्य...

Last Updated: Thursday, July 26, 2012, 17:45

इगतपुरीचं फार्म हाऊस आणि लैला खानचे कसे झाले हत्याकांड. लैलाच्या हत्याकांडाचे केवळ सर्च ऑपरेशन आणि परवेझनं हत्याकांड केलं या पेक्षाही या सा-या कहाणीमध्ये आणखीनं एक साक्षीदार आहे, स्वताहा अबोल राहूनही खूप काही बोलणारं अर्थातच इगतपुरीचं फार्म हाऊस.. ज्या फार्म हाऊसमध्ये हे सारं हत्याकाडं घडल.. त्य़ा फार्म हाऊसच्या नजरेतून पाहिलं की दिसतात ती आणखीन काही रहस्य.. यावरच थेट घेतलेला वेध, फार्म हाऊसचं रहस्य.

अनैतिक संबंधातून लैलासह कुटुंबियांची हत्या

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 17:54

लैला खान आणि तिच्या कुटुंबियांबद्दल सगळ्यांनाच एक उत्सुकता लागून राहिली होती. आज मुंबई क्राईम ब्रान्चचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी या सगळ्या प्रकरणावरचा पडदा बाजुला सारलाय. लैला खान आणि तिच्या कुटुंबियांची हत्या केल्याची कबुली परवेझ टाकनं दिलीय. ही हत्या कशी आणि का करण्यात आली, हे आज उजेडात आलंय.

अखेर बंगल्यानं उलगडलं रहस्य...

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:23

अभिनेत्री लैला खानच्या हत्येचं गूढ आता उकललं आहे. काल तिच्या इगतपुरीच्या बंगल्याच्या परिसरात सहा सांगाडे सापडल्यानंतर आता तिच्या बंगल्यात चाकू आणि लोखंडी रॉड सापडलेत. याच हत्यारांनी लैला आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या या हत्यारांनी निर्घृणपणे करण्यात आल्याचं समोर येतंय.

आजचा दिवस अपघातांचा

Last Updated: Sunday, January 1, 2012, 21:35

आज दिवसभरात राज्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. नवी मुंबईतील नेरुळ इथे ट्रक,टँकर आणि ओम्नीच्या विचित्र अपघातात एका दाम्प्त्याचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य पुण्याचे असल्याचं वृत्त आहे.

टोल की लूटमार?

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 07:29

मुंबई-आग्रा मार्गावरच्या टोल वसूलीमध्ये प्रवाशांची लूट केली जाते आहे. त्यामुळे नाशिकमधल्या प्रवाशांना फटका बसत आहे. नाशिकपासून इगतपुरी आणि चांदवड अशा काही किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी तब्बल ८० रुपयांचा टोल वसूल केला जात आहे.