मनसेच्या आंदोलनाची पातळी घसरली, पोस्टरवर लघुशंका, Ajit Pawar against MNS agitation in Mumbai

मनसेच्या आंदोलनाची पातळी घसरली, पोस्टरवर लघुशंका

मनसेच्या आंदोलनाची पातळी घसरली, पोस्टरवर लघुशंका
www.24taas.com, मुंबई

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनात मनसेचीही पातळी घसरल्याचं समोर आलंय. दादरला सुरू असलेल्या आंदोलनात एका लहान मुलाला पकडून त्याला अजित पवारांच्या पोस्टरवर लघुशंका करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये होता.

अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांबाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानाचे विधिमंडळात पडसाद उमटत असतानाच मनसेनं पवारांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर संघर्ष सुरू केलाय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्याना राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश दिलेत.. मुंबईत आज भारतमाताच्या परिससरात मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

शिवसेनेनं अजितदादांविरोधात १२एप्रिलला एकत्र आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र त्याआधीच मनसेनं आंदोलनात आघाडी घेतलीये. शिवसेनेनंही अजित पवारांच्या विरोधात आंदोलन सुरु केलयं. मुंबईच्या दादर आणि माहीममध्ये आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अजितदादा जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलयं.

First Published: Wednesday, April 10, 2013, 13:25


comments powered by Disqus