Last Updated: Saturday, January 18, 2014, 11:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आपल्यावरील आरोपांचं खंडण केलंय. त्यांना तसा कांगावा केला आहे.
काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांच्या सांगण्यावरुन माझ्याविरुद्ध रचलेलं हे कुंभाड असल्याचं, स्पष्टीकरण घोसाळकर यांनी दिलंय. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे घोसाळकर यांनी स्पष्ट केलं.
म्हात्रे-घोसाळकर प्रकरणावरून शिवसेनेतील वाद तापलेला असतानाच राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागविला. पोलिसांनी शुक्रवारी बोरिवली आयसी कॉलनीतील एम.एम. रुग्णालयात जाऊन म्हात्रे यांची जबानी घेतली.
शिवसेनेचे दहिसर येथील आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन जबानी घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर घोसाळकर मीडियासमोर आलेत.
पाहा व्हिडिओ
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 18, 2014, 11:28