शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई पालिकेत हंगामा, sheetal mhatre cases harvest in Mumbai Corporation

शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई पालिकेत हंगामा

शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई पालिकेत हंगामा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेनेच्या नगसेविका शीतल म्हात्रे यांच्या आरोपानंतर आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर कारवाई झाली नाही. म्हात्रे यांचा प्रश्न सोडविण्यात आला नाही. त्यामुळे महासभा सर्व महिला नगरसेवकांच्या सुरक्षितता आणि सन्मानासाठी कटिबद्ध आहे, असा ठराव मांडण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली. मात्र, याला काही शिवसेना नगरसेवकांनी कडाडून विरोध केल्याने पालिकेत गोंधळ पाहयाला मिळाला.

मनसेच्या मागणीला शिवसेनेच्या तृष्णा विश्‍वासराव आणि किशोरी पेडणेकर यांनी विरोध करून महापौरांच्या दालनातच वाद घालण्यास सुरुवात केली. शीतल म्हात्रे प्रकरण ही आमची पक्षांतर्गत बाब असून, त्यात तुम्ही पडू नका; आम्ही आमचे बघू, असे ठणकावले. यावर सहकारी नगरसेविका गेल्या आठ-दहा दिवसांपासून न्यायाची अपेक्षा करीत असल्याने हा वाद आता पक्षातील राहिलेला नसून, तो चव्हाट्यावर आला आहे. एखाद्या महिलेची छेड रस्त्यावर काढली जात असेल, तर आम्ही गप्प कसे बसणार, असे प्रतिउत्तर देशपांडे यांनी दिले. त्यानंतर वाद वाढला.

अखेरीस महापौरांनी मनसेचे निवेदन स्वीकारून अशा ठरावासाठी नियमांचा अभ्यास करून निर्णय घेऊ, असे सांगून हा वाद थांबविला. दरम्यान, मनसेच्या निवेदनाचा शिवसेनेच्या नगरसेविकांनी धसका घेतलाय. आतापर्यंत या वादावर बोलणे टाळणाऱ्या नगरसेविकांनी मीडियासमोर तावातावाने बोलून शिवसेनेची बाजू मांडली.

पुरुषप्रधान संस्कृती आहे, असे होऊ शकते. हे आरोप पडताळून पाहाणे आवश्‍यक आहे. म्हात्रे आणि डॉ. शुभा राऊळ यांना पक्षाच्या नेत्यांनी बोलावले होते; मात्र त्या गेल्या नाहीत. ही पक्षांतर्गत बाब असून, महिला आयोगाने यात लक्ष घालू नये. डॉ. राऊळ यांचा कोणीतरी वापर करीत आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी भूमिका मांडत अयशस्वी प्रयत्न केला. त्यांना तृष्णा विश्‍वासराव यांनी साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 18, 2014, 07:35


comments powered by Disqus