शीतल म्हात्रेंचे आरोप आमदार घोसाळकर यांनी फेटाळले

शीतल म्हात्रेंचे आरोप आमदार घोसाळकर यांनी फेटाळले

शीतल म्हात्रेंचे आरोप आमदार घोसाळकर यांनी फेटाळले
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई


आमदार विनोद घोसाळकर यांनी शीतल म्हात्रे यांनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

पक्ष नेतृत्वाने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र माजी महापौर शुभा राऊळ आणि नगरसेविका शीतल म्हात्रे या चौकशीच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर आणि सुभाष देसाई हे या प्रकरणाच्या चौकशीसाठी येणार होते. मात्र दोन्ही नगरसेविका अनुपस्थित राहिल्याने ही बैठक रद्द झाल्याचं विनोद घोसाळकर यांनी सांगितलं.

मात्र आम्हाला या विषयावर थेट पक्षनेतृत्वाशी बोलायचं असल्याने, आपण बैठकीला हजर राहिलो नसल्याचं स्पष्टीकरण शुभा राऊळ यांनी दिली आहे.

या बद्दल आपण गजानन कीर्तीकर आणि सुभाष देसाई यांच्याशी बोललो आहोत, त्यांनीही आपल्याला थेट बोलायचे असल्यास निश्चित बोलावे असं सांगितलं आहे, असं शुभा राऊळ यांनी झी मीडियाशी बोलतांना सांगितलं.




व्हिडिओ पाहा : 'झी २४ तास'वर सेनेचे शीतल म्हात्रे आणि विनोद घोसाळकर आमने-सामने... माजी महापौर शुभा राऊळ यांनीही दिली शीतल म्हात्रे यांची साथ... पाहा कशी रंगली ही जुगलबंदी...






इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 15, 2014, 21:01


comments powered by Disqus