शीतल म्हात्रे यांची उद्धव यांच्या पत्नी रश्मी यांनी घेतली भेट, Rashmi took the visit of the sheetal

शीतल म्हात्रे यांची उद्धव यांच्या पत्नी रश्मी यांनी घेतली भेट

शीतल म्हात्रे यांची उद्धव यांच्या पत्नी रश्मी यांनी घेतली भेट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दहिसर येथील शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे सध्या रुग्णालयात दाखल उपचार घेत आहेत. त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

घोसाळकर आणि शीतल म्हात्रे यांच्यातील वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. रक्तदाब वाढल्यामुळे त्यांच्यावर सध्या बोरिवली येथील एम.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. म्हात्रे यांनी घोसाळकर यांच्यावर धमकी दिल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण वादग्रस्त होत असल्याचे लक्षात येताच रश्‍मी ठाकरे यांनी म्हात्रे यांची भेट घेतली.

दरम्यान, रश्मी ठाकरे यांच्या भेटीनंतर म्हात्रे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलण्यास नकार दिलाय. तर दुसरीकडे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि विनोद घोसाळकर यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, या मागणीसाटी काँग्रेसच्या नगरसेविकांनी दहिसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. घोसाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर मनसेनेदेखील या वादात उडी घेतली. आम्ही तुमच्यापाठीशी आहोत, असे म्हटले आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना या प्रकरणी १० दिवसांत अहवाल सादर करण्यासाठी पत्र पाठविलेले असताना, राज्य महिला आयोगानेही घोसाळकर यांना नोटीस पाठवून या आरोपांबाबत स्पष्टीकरण मागविले आहे. तर, आयोगाच्या सदस्य चित्रा वाघ यांनी शुक्रवारी म्हात्रे यांची भेट घेतली.

घोसाळकर यांना नोटीस पाठवून, आयोगाच्या कार्यालयात त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून खुलासा करावा अथवा ३० जानेवारीपर्यंत लेखी खुलासा करावा, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. घोसाळकर यांनी संघटनात्मक पदाचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्याकडून हा खुलासा मागविण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 18, 2014, 06:56


comments powered by Disqus