दहावी-बारावी परीक्षेचा आज निकाल, HSC, SSC October exam results today

दहावी-बारावी परीक्षेचा आज निकाल

दहावी-बारावी परीक्षेचा आज निकाल

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

मंडळाच्या www.msbshse.ac.in आणि www.mahresult.nic.in या संकेतस्थळावरून दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून विषयनिहाय गुण उपलब्ध होणार असून, या गुणांची प्रिंट आऊट घेता येईल.

मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली; तर २५ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडली.

दहावी-बारावी परीक्षांचा निकाल २६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना २९ नोव्हेंबर रोजी गुणपत्रिकांचे वाटप संबंधित शाळा, महाविद्यालयांमधून करण्यात येणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 26, 2013, 09:41


comments powered by Disqus