Last Updated: Tuesday, June 24, 2014, 09:08
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई 21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती... पण, हुश्श ही भयावह परिस्थिती टळली आणि मुंबईकरांनी सुटकेचा श्वास टाकला.
21 जून 2012... या दिवशी म्हणजेच तब्बल दोन वर्षांपूर्वी मंत्रालयाला आग लागली होती... या आगीत अनेक महत्त्वाच्या आगी भस्मसात झाल्या होत्या. त्यानंतर बरीच मेहनत करून भेसूर झालेल्या मंत्रालायाचं रुपडं पालटण्यात आलं... काल, सोमवारी पुन्हा एकदा याच घटनेची पुनरावृत्ती टळली.
दोन वर्षांपूर्वीचीच परिस्थिती काल दुपारी साडे तीनच्या सुमारालाही निर्माण झाली. मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्कीट झालं. यामुळे पहिल्या मजल्यावर छोटीशी आग लागली. यामुळे संपूर्ण मजल्यावर सर्वत्र धुराचं साम्राज्य पसरलं होतं. त्यातच वीजही गेली. त्यामुळे अंधारही होता.
मात्र, मंत्रालयाची अग्निशमन यंत्रणा आणि मुंबई फायर ब्रिगेड यांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळं अनर्थ टळला. या आगीमुळे मंत्रालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे जीवितहानी टळली.
परंतु, या आगीमुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेची पोलखोल झालीय. दोन वर्षांमध्ये कुठलाच धडा घेतलेला नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण, ही आग लागली तेव्हा ना सायरन वाजला, ना त्यावेळी मंत्रालयात फायर हायड्रंट होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 24, 2014, 09:06