Last Updated: Sunday, March 24, 2013, 19:08
www.24taas.com, मुंबईराज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पीएसआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेला नाही.
पोलिसांनी ताठर भूमिका घेतल्यामुळे आमदार नाराज आहेत. उद्या विधीमंडळात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. हे आमदार पुरावे नष्ट करू शकतात, असं कारण सांगत पोलिसांनी जामीनास विरोध केला होता. यामुळे सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी आहे.
तसंच हे प्रकरण जास्त न वाढवण्याचे आदेश गृहमंत्रालयानं पोलिसांना दिले होते. हे आदेश धाब्यावर बसवून पोलिसांनी आमदारांविरोधात आघाडी उघडल्याचा आरोप केला जात आहे.
First Published: Sunday, March 24, 2013, 19:08