पावसाचा जोर कमी, मुंबई पूर्वपदावर, monsoon,rain, Mumbai

पावसाचा जोर कमी, मुंबई पूर्वपदावर

पावसाचा जोर कमी, मुंबई पूर्वपदावर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत सुपरसंडेला धो-धो बरसणा-या पावसाचा जोर आठवड्याच्या सुरुवातीला कमी झालाय. .सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात झालीय. जोरदार पाऊस नसल्यानं लोकल सेवा सुरळीत सुरु आहे तर ट्रॅफिकही पूर्वपदावर आलंय.

आठवड्याभराची विश्रांती घेऊन वीकेंडला हजेरी लावलेल्या पावसाचा जोर रात्रीपासून ओसरला असला तरी मुंबई आणि उपनगरांत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी सुरूच आहेत. मात्र कल्याण डोंबिवली मध्ये पावसाची संतधार कायम आहे. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरु आहे.

येत्या २४ तासात मुंबई सह कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. शिवाय उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्यानं समुद्रात न जाण्याचा सल्लाही देण्यात आलाय. नवी मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे एका दगडखाणीची संरक्षक भिंत घरावर कोसळून २ कामगार ठार झालेत.

या घटनेत एकूण चार कामगार या भिंतीखाली गाडले गेले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळवलं पण यात २ कामगारांना आपला जीव गमवावा लागला. नवी मुंबईत सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील तुंबलं होतं. तर दुसरीकडे पुण्यात दांडेकर पुलाजवळ भिंत कोसळून 3 महिला ठार झाल्याची घटना घडलीय. जोरदार पावसामुळेच ही भिंत कोसळल्याचा अंदाज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 17, 2013, 09:31


comments powered by Disqus