पावसामुळे खोपोलीमध्ये पूरसदृश परिस्थिती Flood situation in Khopoli

पावसामुळे खोपोलीमध्ये पूरसदृश परिस्थिती

पावसामुळे खोपोलीमध्ये पूरसदृश परिस्थिती
www.24taas.com, झी मीडिया, रायगड

रायगड जिल्ह्यात खोपोली शहराला मुसळधार पावसाने झोडपल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. सर्वच सखल भागात पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे एक घर पडलं तर जनजीवन विस्कळीत झालंय.

आंबा, पाताळगंगा, उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर पूर सदृश्य परिस्तिथी निर्माण होण्याची शक्यता आहे. पाताळगंगा नदी पुलावरून पाणी गेल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळं दुपारी कर्जतहून खोपोलीला येणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. तर जुना मुंबई-पुणे महामार्गावरील पुलावरून पाणी जात असल्याने आणि बोरघाटात दरडी पडण्याच्या भीतीमुळे वाहतूक मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून वळवण्यात आली होती.

खोपोलीतील सुभाषनगर भागात दरड पडण्याच्या भीतीने पालिकेने काही नागरिकांचे स्थलांतर केल्याचे माहिती पालिका अधाक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी दिली. तसंच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा खालापूर तहसीलदारांनी दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, June 16, 2013, 23:10


comments powered by Disqus