डॉ. दाभोलकरांच्या फोटोंवरील ‘क्रॉस’चं गूढ काय?, Cross on Dr. Dabholkar`s photo on internet

डॉ. दाभोलकरांच्या फोटोंवरील ‘क्रॉस’चं गूढ काय?

डॉ. दाभोलकरांच्या फोटोंवरील ‘क्रॉस’चं गूढ काय?
www.24taas.com , झी मीडिया, नागपूर

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना धमक्यांचे फोन येत असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही ही हत्या म्हणजे पूर्वनियोजिक कट असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमिवर आता दाभोलकरांच्या फोटोंवर असलेलं ‘क्रॉस’चं चिन्हं काय सांगतं, हा प्रश्न निर्माण झालाय?

आपण गुगलवर डॉ. नरेंद्र दाभोलकर किंवा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे फोटो सर्च केले तर त्यातल्या काही फोटोंवर फुल्या मारल्याचं आढळलंय. या फुल्या असलेले फोटो नेमके कधी पडले, ते कोणी टाकले आहेत, याचं गूढ दाभोलकरांच्या हत्येमुळं आता वाढलंय.

त्यामुळं सायबर सेलनं याचा तपास करावा, अशी मागणी आता जोर धरतेय. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर आता तरी याचा तपास लागणार का? हे बघावं लागेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, August 20, 2013, 13:24


comments powered by Disqus