Last Updated: Monday, March 25, 2013, 15:41
www.24taas.com, मुंबईसंजय दत्त प्रकरणी शिवसेनेने यूटर्न मारला आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सेनेनं संजय दत्त यांची पाठराखण केली होती.
मात्र आता संजय दत्तला माफी देण्यास शिवसेनेनं विरोध दर्शवलाय. संजय दत्तला सरकारने माफी देऊ नये, या प्रकारचं वक्तव्य शिवसेनेच्या आमदार नीलम गो-हे यांनी विधान परिषदेत केल होतं. यामुळे समाजासमोर चुकीचा पायंडा पडेल, असंही त्यांनी म्हटलय. संजय दत्तला शिक्षा व्हायलाच हवी, असं मतही त्यांनी यावेळी नोंदवलय.
काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे नेते मात्र संजय दत्तच्या बचावासाठी पुढे धावलेले दिसून आलं आहे. जयाप्रदांनंतर काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनीही संजय दत्तची पाठराखण करत संजय दत्तची चूक हा काही गुन्हा नाही, असं वक्तव्य केलं आहे.
First Published: Monday, March 25, 2013, 15:41