Last Updated: Thursday, March 21, 2013, 17:28
www.24taas.com, नवी दिल्लीसंजय दत्तला सुनावलेल्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कमी करण्यासाठी संजय दत्तकडून प्रयत्न केले जाणार आहेत. संजय दत्तसाठी शिक्षा कमी करण्याचा हा शेवटचा प्रयत्न असणार आहे.
संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय दत्त आता पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे समजते आहे. शिक्षेवर पुनर्विचार करण्यात यावा यासाठी त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षा कमी करुन घेण्यासाठी हा त्याचा शेवटचा प्रयत्न असेल. नाहीतर आणखी साडेतीन वर्ष त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे. संजय दत्तचे वकील सतीश मानेशिंदे हे पुर्नविचार याचिका दाखल करणार आहेत.
First Published: Thursday, March 21, 2013, 14:50