संजय दत्तच्या मदतीसाठी राष्ट्रवादीही सरसावली, ncp demand for sanjay dutt forgiven

संजय दत्तच्या मदतीसाठी राष्ट्रवादीही सरसावली

संजय दत्तच्या मदतीसाठी राष्ट्रवादीही सरसावली
www.24taas.com, मुंबई

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टाने ५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीये. मात्र, न्यायालयाने संजय दत्तला माफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केलीये.

याबाबत महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विनंती करावी, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी म्हटलंय. तर समाजवादी पार्टीनेही संजय दत्तच्या माफीची मागणी केलीय.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर संजय दत्तला मोठा धक्का बसलाय. निकालानंतर संजय दत्तला आपले अश्रू अनावर झाले. कालपासून त्याला भेटण्यासाठी बॉलीवुडमधल्या त्याच्या मित्रांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी होती. अनेक दिग्गज व्यक्तींनी संजय दत्तची भेट घेतली. यावेळी संजय दत्तला आपले अश्रू रोखता आले नाहीत. कोर्टाच्या निर्णयानुसार त्याला चार आठवड्यात स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करायचंय... पाच वर्षांपैकी अठरा महिने शिक्षा त्यानं भोगलीय. त्यामुळं साडेतीन वर्ष त्याला तुरुंगात जावं लागणार आहे.

First Published: Friday, March 22, 2013, 13:54


comments powered by Disqus