Last Updated: Thursday, November 24, 2011, 15:37
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
मुंबईत बसमधून बाहेर डोकावताना एका शाळकरी मुलाच्या मृत्यू झाला. आणि यांचे हिंसक पडसाद उमटले आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायनच्या वल्लभ शिक्षण संगीत आश्रम शाळेत तोडफोड केली. बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. काल एका ८ वर्षांच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागला. विराज परमार असं या मुलाचं नाव आहे.
स्कूल बसमधून तो घरी चालला होता. त्यावेळी बसमधून बाहेर डोकावत त्यानं आपलं डोकं खिडकीच्या बाहेर काढलं आणि त्याचवेळी एका होर्डिंगला त्याची धडक झाली. या घटनेत विराजचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर जखमी विराजला हॉस्पिटलमध्ये न्यायचं सोडून बसच्या ड्रायव्हरने मात्र तिथून पळ काढला. बसच्या खिडक्यांना जाळी नसल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येतं.
First Published: Thursday, November 24, 2011, 15:37