विदर्भात पावसाचे २० बळी, 20 dead in vidarbh due to heavy rain

विदर्भात पावसाचे २० बळी

विदर्भात पावसाचे २० बळी
www.24taas.com
विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय. पावसामुळं २० जणांचा बळी गेलाय. विदर्भातल्या बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक धरणं भरून वाहू लागली आहेत.

नागपूर, अमरावती, गोंदीया यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातली अनेक गावं पाण्याखील जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १० जणांचा मृत्यू झालाय. वर्धा जिल्ह्यातही पावसामुळं पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आर्वी तालुक्यात पुराची स्थिती असून ३०० घरांची पडझड झाली आहे. तसेच दीडशे जनावरंही पावसामुळं मृत्यूमुखी पडली आहेत. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाच गावांचा संपर्क तुटला असून नदी काढच्या गावांना गाव सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इरई नदीनं चंद्रपूर शहराला वेढा घातलाय. ३७ वर्षांनंतर प्रथमच हे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. इरई धरणाची सर्व दरवाजे उघडल्याने चंद्रपूर शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून शहरातल्या शाळा आणि समाज मंदिरे खुली करण्यात आली असून प्रभावित नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

First Published: Thursday, September 6, 2012, 10:43


comments powered by Disqus