भरदिवसा शाळकरी मुलीचं अपहरण आणि विनयभंगKidnapping and molest school Girl in Chandrapur

भरदिवसा शाळकरी मुलीचं अपहरण आणि विनयभंग

भरदिवसा शाळकरी मुलीचं अपहरण आणि विनयभंग
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर

चंद्रपूर शहरात एक खळबळजनक घटना घडली. एका अल्पवयीन शाळकरी मुलीचं शाळेसमोरूनच एका वाहनातून पाच तरुणांनी अपहरण केलं आणि तिचा चालत्या गाडीतच विनयभंग करत तिला चंद्रपूर-नागपूर महामार्गावरच्या भद्रावती शहराजवळच्या एका मंदिराजवळ गाडीतून फेकून दिलं.

बेशुद्धावस्थेत असलेली ही मुलगी शुद्धीवर आली तेव्हा तिला त्या भागातील २ तरुणांनी भद्रावती पोलीस ठाण्यात पोहचविले. यानंतर मुलीच्या पालकांना घटनेची माहिती दिली गेली. त्यानंतर पहिल्यांदा पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं उघड झालं. पीडित मुलीनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता या घटनेची सत्यता पडताळण्याची कारवाई सुरु केली आहे.

दरम्यान मुलीनं दिलेल्या माहितीच्या आधारे मध्यरात्री पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात अपहरण आणि विनयभंग यासह मारहाणीचे गुन्हे दाखल करत तपास चालविला आहे. दिवसाढवळ्या आणि शहराच्या मध्यभागी झालेल्या या घटनेनं अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.



पाहा व्हिडिओ


First Published: Thursday, December 19, 2013, 11:54


comments powered by Disqus