Last Updated: Tuesday, December 11, 2012, 23:46
www.24taas.com, नागपूरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाचा वाद निर्माण झाल्यानं शिवसैनिकांत गोंधळाचं वातावरण आहे. शिवाजी पार्कवरचा चौथरा हटवू देणार नाही. अशी भूमिका घेणा-या शिवसेनेच्या काही बोलघेवड्या नेत्यांनी मग शिवाजी पार्कचे शिवतीर्थ असं नामांतर करण्याचा आग्रह धरला आणि शिवसेनाप्रमुखांच्या निधनानं दु:खसागरात बुडालेल्या शिवसेनेला सैरभैर अवस्थेत नेलं...
शिवाजी पार्कवरील चौथरा हटविणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीत शिवसेना नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केलीय. शिवसेना नेत्यांनी दोन प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले आहेत.
त्यात नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या, हा एक प्र्सताव ठेवण्यात आलाय, तर शिवाजी पार्कमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी स्मारकाला जागा द्या, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
First Published: Tuesday, December 11, 2012, 23:46