पाण्यासाठी प्राण्यांची वणवण Animals in Drought

पाण्यासाठी प्राण्यांची वणवण

पाण्यासाठी प्राण्यांची वणवण
www.24taas.com, नाशिक

दुष्काळाचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागले आहेत. दुष्काळाने नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात नागरिकांबरोबर भटकणारी हरणेही तहानली आहेत. कासावीस झालेल्या या हरणांचा विहिरीत पडून मृत्यू होत आहे.

पाण्याअभावी रुक्ष रखरखीत झालेल्या राजापूर जंगलातलं हे भयाण दृश्य. एरवी जंगल परिसरात बागडणारी ही हरणं आता पाण्याच्या शोधात भटकत आहेत. जंगलात पाणी नाही म्हणून मोर, हरणं थेट शेत्तात्तल्या विहिरींकडे धाव घेतायंत. दिवसा हरीण घाबरत असल्याने रात्री पाण्याचा शोध घेत आहेत. मात्र पाणी पिण्याच्या या धडपडीत अनेक हरीण विहीरीत पडून मरण पावत आहेत.


या परिसरातील तब्बल साडे सात हजार हेक्टरवर नऊ हजार हरीण आणि पाच हजारांवर मोर आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात इथे सरसरी डझनभर हरणांचा आणि मोरांचा मृत्यू होतोय हे दुर्दैवच म्हणावं लागेल. राजापूर गावात पाणी नाही म्हणून जनावरे चारण्यासाठी लोकांना बाहेर जावं लागतंय. वनक्षेत्रात पाण्याचे साठे कोरडे झाल्याने टॅकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ वन विभागावर येऊन ठेपलीये...एकूणच भीषण दुष्काळाचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांच्याही जीवावर उठलेत यासारखं दुर्दैवं ते काय...

First Published: Sunday, March 17, 2013, 23:59


comments powered by Disqus