लोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!Anna Hazare says move ahead with the Bill, bu

लोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!

लोकपाल विधेयकाबाबत अण्णा ‘संतुष्ट’ तर केजरीवाल ‘रूष्ट’!
www.24taas.com, झी मीडिया, राळेगणसिद्धी, नवी दिल्ली

लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. या उपोषणाला समाजाच्या विविध थरातून पाठींबा मिळतोय. त्यातच लोकपाल विधेयक संमत करून घेण्यासाठी आज काँग्रेसनं प्राधान्य असल्याचं जाहीर केल्यावर अण्णा हजारे यांनी सरकारी लोकपालावर आपण समाधानी असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभेत लोकपाल संमत झाल्यास आपण उपोषण सोडू असं अण्णा हजारे यांनी आज स्पष्ट केलंय.

मात्र अण्णांना सरकारी लोकपाल मान्य असलं तरी अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केलीय. ट्वीटरवर अरविंद केजरीवाल म्हणाले, “अण्णांची कोणीतरी दिशाभूल करत असल्याचं म्हटलं आहे. सरकार विधेयक हे लोकपाल नव्हे तर जोकपाल आहे. अण्णांनी हे विधेयक मान्य केलं असलं तरी आमची जनलोकपालसाठीची लढाई सुरुच राहील असं ट्विट केजरीवाल केलं आहे”.

अण्णांनी सरकारी लोकपाल मान्य केलं असलं तरी आम्ही जनलोकपालसाठी लढा सुरुच ठेवू असं केजरीवाल यांची सांगितलं आहे. त्यामुळं दोन वर्षापूर्वी जनलोकपालसाठी जंतर-मंतरवर एकत्र आंदोलनाला बसलेल्या अण्णा आणि केजरीवाल यांच्यातले मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

दुसरीकडं भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनीही लोकपाल विधेयकाला पाठिंबा दिला आहे. सिलेक्ट कमिटीनं प्रस्तावित केलेलं लोकपाल विधेयक विनाचर्चा मंजूर करायला भाजप तयार असल्याचं स्वराज यांनी सांगितलं.

दरम्यान, आज अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही पाठींबा दिलाय. रामदास आठवले आज अण्णा हजारे यांच्या आंदोलनस्थळी पोहोचले. तिथं त्यांनी अण्णांच्या उपोषणाला पाठींबा जाहीर करत लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक आणण्याची मागणी केली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 14, 2013, 21:08


comments powered by Disqus