Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिकमध्येही वादळी-वाऱ्यासह पाऊस पडला. तर गारपिटीमुळे शहरात सर्वत्र बर्फाच्छादीत काश्मीर अवतरलं. वादळी पावसाने नाशिक शहरात अंधाराच साम्राज्य पसरलं होतं.
जागोजागी झाडे पडल्याने वाहतूक मंदावली होती. शहरात पन्नास पेक्षा अधिक वाहनाचे अपघात झाले तर काही ठिकाणी झाडे कोसळून वाहनाचा चुराडा झाला.
नाशिक जिल्ह्यातील देवळाली परिसरातील तेरा गावांना आज गारपीट पावसाचा जोरदार तडाखा बसला. वंजारवाडी लहवितसह डाळिंब बागा शेती उधवस्त झाली आहे. तर अनेक ठिकाणी आंबे रस्त्यावर विखुरले होते. त्र्यंबकमध्ये मंदिराचे काम सुरु असताना वीज पडल्याने दोन जण ठार तर एक जण जखमी झाले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 28, 2014, 09:45