Last Updated: Friday, December 28, 2012, 17:51
www.24taas.com, जळगावजळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात अनैतिक संबंधांतून विवाहितेला जाळून मारण्यात आलं आहे. विवाहितेला पेटवल्यानंतर प्रियकरानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
प्रियकर सुनील तायडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधांतून विवाहितेला जाळून मारल्यानंतर प्रियकराने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रियकर सुनील तायडे याचे विवाहीत महिलेशी अनैतिक संबंध होते. मात्र या दोघांमध्ये काही वाद झाल्याने सुनील तायडे याने महिलेला जिवंत जाळलं. त्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे समजते. तर त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला.
First Published: Friday, December 28, 2012, 15:10