Last Updated: Friday, December 28, 2012, 13:41
www.24taas.com, सिंगापूरदिल्ली सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीच्या मेंदूला दुखापत झाल्याचं सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. तिच्या आतड्यालाही संसर्ग झाला आहे.
हॉस्पिटलनं आज जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार तरुणीच्या शरीरातील जंतूसंसर्ग खूपच वाढला आहे. त्यामुळं तिला श्वास घ्यायलाही त्रास होतो आहे.
रक्तातही जंतूसंसर्ग आहे. त्यामुळं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागत आहे. संसर्ग कमी झाल्यानंतरच तिच्यावर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रीया करणं शक्य होणारे. सध्या तिची प्रकृती स्थिर करण्यालाच डॉक्टर प्राधान्य देत आहेत.
First Published: Friday, December 28, 2012, 13:34