Last Updated: Friday, December 28, 2012, 10:50
www.24taas.com, सिंगापूरउपचारासाठी सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या दिल्ली गँगरेप पीडित तरुणीची तब्येत खूपच नाजूक झाली आहे.
एलिझाबेथ हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या माहितीनुसार तरुणीच्या शरीरातील जंतूसंसर्ग खूपच वाढला आहे. त्यामुळं तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आहे.
रक्तातसुद्धा जंतूसंसर्ग वाढला आहे. त्यामुळं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं आहे. जेव्हा जंतुसंसर्ग कमी होईल तेव्हाच तिच्यावर अवयव प्रत्यारोपण शक्य आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर करण्यालाच डॉक्टर प्राधान्य देत आहेत.
बुधवारी रात्री ११.४० वाजता दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून एअर अँम्ब्युलन्सद्वारे तिला सिंगापूरला हलवण्यात आले. तेथे ग्लेनईगल समूहाच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
First Published: Friday, December 28, 2012, 10:42