आश्रमशाळेतील मुलीवर बलात्कार करणारे दोघं अल्पवयीन, two Immature boy Rape Aadhivasi Hermitage girl

आश्रमशाळेतील मुलीवर बलात्कार करणारे दोघं अल्पवयीन

आश्रमशाळेतील मुलीवर बलात्कार करणारे दोघं अल्पवयीन
www.24taas.com, नाशिक

नाशिक जिल्ह्यातल्या पळसण आश्रमशाळेतल्या मुलीवर झालेल्या गँगरेपप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीये. सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाच आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

अल्पवयीन मुलांनी पीडित मुलीवर बलात्कार केलाय़. आज या आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आणखी एका आरोपीला अटक करण्यात आलीये. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आदिवासी खात्यानही कंबर कसलीये.

आदिवासी विकास आयुक्तलायामार्फत चौकशी समितीची स्थापना करण्यात आलीये. या प्रकरणात हलगर्जी करणा-या अधिका-यांवरही कारवाईची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे.

First Published: Friday, December 28, 2012, 16:20


comments powered by Disqus