Last Updated: Wednesday, March 7, 2012, 16:56
www.24taas.com, धुळे धुळ्याच्या भांडी बाजारात होळीनिमित्त डोलची बनवण्याची धावपळ सुरू आहे. खान्देशात डोलचीशिवाय होळीच्या रंगांची उधळणच केली जात नाही.
होळी उत्सवाच्या पंधरा दिवस आधीपासून व्यापारी डोलची तयार करायला सुरूवात करतात.पिचकारी प्रमाणेच डोलची पाणी भरुन त्याचे फटके मारुन होळी साजरी केली जाते. खास करुन तरुण मंडळींकडून आकर्षक डोलचीची मागणी जास्त असते.
वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्याप्रकारे होळी खेळली जाते तसच खान्देशातही होळी खेळण्याची वेगळीच पद्धत आहे. त्यामुळे खानदेशात डोलचीला विशेष महत्त्व आहे.
झी 24 ताससाठी धुळ्याहून प्रशांत परदेशी
First Published: Wednesday, March 7, 2012, 16:56