महामार्गावरील दोन अपघातांत ११ ठार , accident, solapur

महामार्गावरील दोन अपघातांत ११ ठार

महामार्गावरील दोन अपघातांत ११ ठार
www.24taas.com,झी मीडिया,सोलापूर/पुणे

सोलापूर हैदराबाद महामार्गावर ट्रक आणि तवेरामध्ये झालेल्या अपघातात ९ ठार तर २ जण गंभीर जखमी झालेत. कर्नाटकातील हुमानाबादमध्ये हा अपघात झालाय.

अपघातग्रस्त तवेरा महाराष्ट्रातील असून सर्व मृत हे सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. सोलापूर-हैदराबाद मार्गावर हुमनाबाद येथे आजपहाटे टँकर आणि तवेरा यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातातील जखमींना उमरगामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेट्ये कुटुंबीय तवेरातून जात असताना हा अपघात झाला. या अपघातात श्यामराव जाधव, विश्वास जाधव, कुसुमा जाधव, अभिषेक शेट्ये, विश्वास शेट्ये यांचा जागीच मृत्यू झाला. तर, वैष्णवी शेट्ये हिचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अन्य मृतांची नावे समजू शकली नाहीत. शेट्ये कुटुंबीय मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅंकर अपघात

पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड मार्गावर अमोनिया टॅंकरला अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान, वायुगळतीची भिती असल्याने तात्काळ अग्नीशामक दलाच्या बंबाद्वारे पाण्याचा फवारा करण्यात आलाय. या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

या टँकरमधील गॅस लीक झाल्यानं स्थानिकांना त्याचा त्रास सुरू झाला होता. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ कारवाई करत ही गॅसगळती थांबवलीये. अपघातग्रस्त टँकर बाजूला काढण्याचं काम अद्याप सुरूच आहे.

First Published: Sunday, April 28, 2013, 11:49


comments powered by Disqus