गांधी हत्या करणाऱ्या शक्तीने केले कृत्य- मुख्यमंत्री, ghadhi assassination power has kill dhabholkar- CM

गांधी हत्या करणाऱ्या शक्तीने केले कृत्य- मुख्यमंत्री

गांधी हत्या करणाऱ्या शक्तीने केले कृत्य- मुख्यमंत्री
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही राजकीय हत्या आहे. ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शक्तींनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निषेध नोंदवला. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, हा प्रश्न होतं आहे.

कोल्हापुरात काँग्रेसच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रात अजूनही नरबळीची प्रथा सुरू आहे. हे सर्व मागासलेल्या आणि आदिवासी भागात सुरू आहे. कोणी तरी वैदू येतो, कोणी तरी भोंदू येतो काही तरी करा म्हणून सांगतो. याच्या वेदना होतात की आपण २१ व्या शतकाकडे चाललो आहे, पण अशा अघोरी प्रथा काही काही भागात सुरू आहे. एखाद्याला सर्पदंश झाला की मांत्रिक येतो आणि म्हणतो की डॉक्टराकडे जायचं नाही. मग त्याचा मृत्यू होतो. अशा प्रथा दूर करण्यासाठी डॉ. दाभोलकर यांचा प्रयत्न सुरू होता.
ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली. त्याच शक्तीने दाभोलकरांची हत्या केल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी कोणाकडे रोख केला हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंदुत्ववादी संघटना या हत्येमागे आहेत का? असे पत्रकारांनी विचारताच ते म्हणाले, की अद्यापही या हत्येचा तपास सुरू आहे. आताच काही बोलणे योग्य होणार नाही. पण या हल्ल्यामागे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. या घटनेचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपणवण्यात आला असून, हल्लाखोरांची योग्य माहिती देणा-यास १० लाख रुपयाचे इनाम देण्यात येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 20, 2013, 20:15


comments powered by Disqus