अजितदादांचं पिंपरी-चिंचवड, बनलं गुन्हेगारांचं नंदनवन Increasing Crime rate at Pimpri-Chinchwad

अजितदादांचं पिंपरी-चिंचवड, बनलं गुन्हेगारांचं नंदनवन

अजितदादांचं पिंपरी-चिंचवड, बनलं गुन्हेगारांचं नंदनवन
www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीनं कळस गाठला असतानाच, एक धक्कादायक घटना उघड झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित उर्फ अप्पा काटे यांनी एका भंगार व्यावसायिकाला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा भोसरी स्थानकात दाखल झालाय.

9 डिसेंबर - ४ वर्षांच्या मुलीवर बलत्कार आणि हत्या

10 डिसेंबर - अज्ञात इसमांचा सोने व्यापा-यावर हल्ला आणि लूट......

11 डिसेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित उर्फ अप्पा काटे यांच्यासह १० जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वेगानं विकसित होणा-या पिंपरी चिंचवडची ही दुसरी बाजू आहे.. गेल्या काही दिवसात पिंपरी-चिंचवड गुन्हेगारांचं नंदनवन झाल्याची स्थिती आहे. आता तर थेट महापालिकेच्या नगरसेवकानंच खंडणी उकळल्याचं उघड झाल्यानं शहरात एकच खळबळ उडालीय.

उद्योग नगरी म्हणून लौकिक असलेली ही नगरी सध्या भीतीच्या सावटाखाली वावरतेय. या परिस्थितीतही पोलीस उपायुक्त शाहजी उमप नागरिकांना धीर देण्यासाठी कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा खरंच राम भरोसे आहे, असंच म्हणावं लागेल.

First Published: Tuesday, December 11, 2012, 20:14


comments powered by Disqus