खडसेंनी हाणला राज ठाकरेंना जोरदार टोला!, EKNATH KHADASE SLAM ON RAJ THACKERAY

खडसेंनी हाणला राज ठाकरेंना जोरदार टोला!

खडसेंनी हाणला राज ठाकरेंना जोरदार टोला!
www.24taas.com, मुंबई
राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पटलवार केलाय.

काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी खडसेंवर आरोप केले होते. त्याला आज खडसेंनी उत्तर दिलं. मी सेटिंग करत असतो, तर कोहिनूर मिल माझ्या नावावर असती आणि SRAचे प्रकल्प माझ्या नावावर असते, अशा शब्दांत खडसेंनी राज ठाकरेंना टोला हाणलाय.

स्वबळावर लढण्यावरही राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोमणा मारला. सकाळी स्वबळावर लढण्याची भाषा करायची आणि संध्याकाळी सेटिंग करायचं ही राष्ट्रवादी काँग्रेसची पद्धत असल्याचं मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी १० मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केले होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंवरही तोफ डागली होती. ते म्हणाले, एकनाथ खडसे, मनसे आमदारांना बोलू देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरेंनी खंजीर खुपसला
राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.
राज ठाकरे कशाप्रकारे पाठित खंजीर खुपसतात हे आता भाजपला कळलं असेल अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेनं दिली आहे. शिवाय सेटलमेंटचे आरोप करुन राज ठाकरे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विधानसभेचे शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी केला आहे.

First Published: Monday, March 11, 2013, 17:31


comments powered by Disqus