Last Updated: Thursday, March 21, 2013, 13:54
www.24taas.com, मुंबईअभिनेता संजय दत्त याला अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनविण्यात आली. गेले २० वर्ष हा खटला सुरू होता. त्यामुळे या हाय प्रोफाईल खटल्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. आज खटल्याचा निकाल सुनविण्यात आल्यानंतर संजय दत्तने निकाल मान्य असल्याचे मान्य केले. तर दुसरीकडे त्याची बहीण आणि खासदार प्रिया दत्त यांना मात्र अश्रू अनावर झाले.
संजय दत्त याला शिक्षा झाल्याचे जाही झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी प्रतिक्रियेसाठी विचारले असता, त्यांनी कोणीतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र याच वेळेस त्यांना त्यांच्या भावनांना आवर घालता आला नाही. आणि त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
संजय दत्तला ६ वर्षांची शिक्षा १ वर्षानं कमी करुन पाच वर्ष करण्यात आलीये. अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आलीये. त्यानं यापूर्वी १८ महिन्यांचा कारावास भोगलेला आहे. त्यामुळं आता त्याला पुन्हा पोलिसांना शरण जावं लागणार आहे. चार आठवड्यात संजय दत्तला शरणागती पत्करावी लागणार आहे.
First Published: Thursday, March 21, 2013, 13:22