Last Updated: Thursday, August 22, 2013, 09:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ नंतर फिल्मी जगतात धम्माल उडवून देणारी भारतीय-कॅनाडियन अभिनेत्री सनी लिओन आता लवकरच आणखी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.
‘नच बलिए’च्या सहाव्या पर्वात सनी लिओन दिसेल, अशी चर्चा सुरू आहे. कार्यक्रमाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी सनी लिओनशी संपर्क साधण्यात आलाय. परंतु, ती या कार्यक्रमात सहभागी होणार किंवा नाही यासंबंधी प्रत्यक्ष सनीकडून मात्र काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही. ‘जिस्म २’मधूनही सनी प्रेक्षकांच्या समोर आली होती.
या कार्यक्रमासाठी सध्यातरी ‘ज्युनिअर मास्टरशेफ’मध्ये व्यस्त असणारा कुणाल कपूर, ‘मास्टरशेफ इंडिया’चा विजेता रिपो हांडा, माजी क्रिकेटर सौरव गांगुली आणि टीव्ही अभिनेता शब्बीर अहलुवालिया यांच्याशीही संपर्क साधण्यात आलाय.
या वर्षाच्या सुरुवातीला ‘नच बलिए’चं पाचवं पर्व संपलं होतं. यामध्ये जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही विज विजयी झाले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, August 22, 2013, 09:53