माझगांव डॉक लिमिटेडमध्ये मेगा भरती

Last Updated: Friday, June 20, 2014, 15:59

माझगाव डॉकमध्ये मेगा भरती सुरू आहे. कुशल आणि अकुशल तांत्रिक वर्गाच्या १८३५ जागांसाठी ही भरती होत आहे. क्लास टू, नियंत्रक निरीक्षक, भांडारपाल, मॅकॅनिस्ट आदी पदांच्या या जागा भरण्यात येणार आहेत.

मराठा आरक्षणाचा निर्णय 21 जूनला करणार जाहीर - राणे

Last Updated: Friday, June 13, 2014, 17:15

मराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल, असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली.

नोकरी : वित्त विभागात अकाऊंटस्/क्लार्क पदांसाठी भरती

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 19:59

लेखा लिपिक / लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखपाल / कनिष्ठ लेखा परिक्षक यांची एकूण 516 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय

राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार

Last Updated: Thursday, May 15, 2014, 08:58

राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.

मिहानमुळे सुरूवातीला मिळणार 5 हजार नोकऱ्या

Last Updated: Monday, April 21, 2014, 17:20

मिहानमुळे पाच हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. नागपुरकरांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब समजली जात आहे. मिहान प्रकल्पामुळे नागपुरचा चेहरा-मोहरा बदलेल असं म्हटलं जातं.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती

Last Updated: Friday, February 28, 2014, 13:32

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती

वन विभागात नोकरी, व्हा फॉरेस्ट ऑफिसर!

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 13:06

महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा २०१४ अंगर्तगत महाराष्ट्र सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २७ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मार्च २०१४ आहे.

नोकरीची संधी - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान

Last Updated: Thursday, February 20, 2014, 15:53

राज्यात `राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना`ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानची स्थापना केली आहे. यासाठी पदांची नेमणूक करण्यात येणार आहे.

सिटी ग्रुपकडून २५०० जणांना नोकरीची संधी

Last Updated: Thursday, January 30, 2014, 17:25

आंतरराष्ट्रीय सिटी बँक भारतात रोजगार उपलब्ध करून देणार आहे. यावर्षी सिटीग्रुपकडून भारतात २५०० लोकांना हायर केलं जाणार आहे.

मुंबईत नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 12:46

तुला नोकरी लावतो, असे सांगून एका तरूणानाने कळवा, ठाणे येथील एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. ही घटना २३ जानेवारी रोजी बांद्रा येथील एका झोपडपट्टीत घडली. याप्रकरणी सहकार्य करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

खुशखबर : रेल्वेमध्ये २६,५६७ जागांसाठी भरती!

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 11:17

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी लवकरच रेल्वे बोर्डातर्फे देशातील तरुणांसाठी उपलब्ध झालीय. रेल्वे बोर्डानं तब्बल २६ हजारांपेक्षा जास्त जागांसाठी तरुणांना अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे.

वेळापत्रक : करा सरकारी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी...

Last Updated: Monday, January 6, 2014, 08:02

पाहा, या वर्षात तुम्ही कोणकोणत्या परीक्षा आणि कोणत्या पदांसाठी देऊ शकाल... आणि त्यानुसार करा तुमची अभ्यासाची तयारी...

नवीन वर्षातील गुड न्यूज - सरकारी नोकरीची संधी

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 12:42

महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातील आणि आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या अधिपत्याखालील मत्स्यव्यवसाय विभागातील सर्व प्रादेशिक व जिल्हा कार्यालयातील एकूण ६२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील सहा प्रादेशिक विभागीय कार्यालयस्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

आकाशवाणीत विविध पदांसाठी 10 हजार जागांची भरती

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 10:59

केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनीष तिवारी यांनी गुरूवारी लोकसभेत एक प्रश्नावर लिखित उत्तर देताना सांगितले की, आकाशवाणीमध्ये विविध श्रेणीच्या पदांसाठी सुमारे १० हजार जागा रिकाम्या आहे.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात नोकरीची संधी

Last Updated: Thursday, November 21, 2013, 16:11

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णयानुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मागासवर्गी आणि खुला प्रवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवेची घोषित सात पदे असून एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी

Last Updated: Thursday, November 21, 2013, 10:48

चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

संरक्षण मंत्रालयात १८१ जागांसाठी भरती

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 14:15

संरक्षण मंत्रालयात कुशल कामगारांसाठी १८१ जागा भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी ५ नोव्हेंबर २०१३पर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांना ३ टक्के आरक्षण!

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 08:43

सुप्रीम कोर्टानं अपंगांना मोठा दिलासा दिलाय. अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्याच्या धोरणाची येत्या तीन महिन्यात अंमलबजावणी करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र तसंच सर्व राज्य सरकारांना दिलेत.

चला, नोकरीची संधी...जलसंपदा विभागात भरती

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 16:10

जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्याखालील असलेल्या आस्थापनेवरील नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गट-ड संवर्गातील सर्व जातनिहाय आणि समांतर आरक्षणनिहाय सर्व प्रवर्गातील सरळसेवा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

LIC सुरू करणार देशातील सर्वांत मोठी बँक

Last Updated: Sunday, April 21, 2013, 22:28

LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळ आता देशातील सर्वांत मोठी बँक स्थापन करणार आहे. एलआयसी देशात सर्वाधिक मोठं जाळं असणारी बँक सुरू करणार आहे. LIC ने जर बँक सुरू केली, तर देशभरात १ लाखाहून अधिक नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्टीव्ह जॉब्सची ‘आय-कार’ची स्वप्नपूर्ती अधुरी

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 13:38

आयफोन आणि आयपॅडची जगावर मोहिनी घालणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांचे एक स्वप्न अधुरे राहीले. आयफोन आणि आयपॅडचे निर्माते स्टीव्ह यांना ‘आय-कार’ तयार करायची होती. मात्र, त्यांच्या निधनामुळे हे स्वप्नच राहिले.

बँकांचे कारभार ठप्प

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 16:18

बँक कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारलाय. संपात देशातल्या बहुतांश बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग आहे. त्यामुळं बहुतांश बँकांचे कारभार ठप्प झालेत.

जाट समुदायाचे आंदोलन चिघळले

Last Updated: Saturday, March 10, 2012, 23:25

जाट समुदायाने ओबीसी कोट्यांतर्गत सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हरियाणा बंद आंदोलन केले. हे आंदोलक चिघळले. दरम्यान पोलीस यांच्यात झालेल्या वादातून एक तरुण ठार, तर अनेक जण जखमी झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

१० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 19:06

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.

स्टीव्ह जॉब्स ही खेळण्याची वस्तू नाही

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 21:04

ऍपलचे सहसंस्थापक आणि टेक्नोलॉजी जगताचा सम्राट स्टीव्ह जॉब्सवर प्रतिकृती असलेली बाहुली चीनी कंपनीने बाजारपेठेतून मागे घेतली आहे. ऍपलचे कायदेशीर सल्लागार यांनी कंपनीवर मोठा दबाव टाकल्याने कंपनीला हे पाऊल उचलावं लागल्याचं वृत्त आहे

स्टीव्ह जॉब्स यांना मरणोत्तर ग्रॅमी

Last Updated: Thursday, December 22, 2011, 11:51

ऍपलचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांना पुढच्या वर्षी मरणोत्तर ग्रॅमी ट्रस्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संगीताचा आस्वाद घेण्याच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करण्याच्या योगदानाबद्दल जॉब्स यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

स्टे 'हंगेरी', स्टे फुलीश !

Last Updated: Sunday, December 11, 2011, 03:51

ऍपलचे को-फाऊन्डर स्टीव्ह जॉब्स यांच्या स्मरणार्थ हंगेरीत त्यांचा ब्रॉन्झ पुतळा उभारला जाणार आहे. हंगेरीयन सॉफ्टवेअर मेकर गाबोर बोजर यांनी हा पुतळा तयार करून घेतलाय. स्टीव्ह जॉब्स यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं.

नाशिक महापालिकेत नोकरभर्तीचा वाद !

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 12:35

नाशिक महापालिकेनं नोकरभर्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मात्र या भर्तीवरुन वाद सुरु झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप होतोय. या भरतीप्रक्रियेमुळे महापालिकेतही नाराजी आहे.

स्टीव्ह जॉब्सच्या व्यक्तीमत्त्वाची दुसरी बाजू

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:51

स्टीव्ह जॉब्सच्या निधनानंतर जगभरात शोक व्यक्त केला गेली. आजवर कोणत्याही उद्योजकाच्या निधनानंतर जागतिक स्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर शोकाकुल प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नसतील. अर्थात जॉब्सचं कर्तृत्व आभाळा एवढं होतं हे निर्विवाद सत्य आहे.