खड्यांनी घेतला महिलेचा बळी, एक जखमी, woman`s death to Road ditch in vasai

खड्यांनी घेतला महिलेचा बळी, एक जखमी

खड्यांनी घेतला महिलेचा बळी, एक जखमी
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

वसईतल्या खड्यांनी एका महिलेचा जीव घेतलाय. वसईतल्या एव्हरशाईन परिसरातल्या रस्त्यातल्या खड्यात पडून या महिलेचा मृत्यू झालाय.

आशा तानाजी डमडेरे असं या मृत महिलेचं नाव आहे. विशेष म्हणजे या दुर्दैवी घटनेनंतर माणिकपूर पोलिसांनी या मृत महिलेलाच आरोपी बनवलंय. तर वसईत राहणारी दक्षा नागडा ही महिला खड्ड्यात पडून गंभीर जखमी झालीय.

दक्षा या आपल्या गाडीवरुन जातांना वसईच्या एव्हरशाईन परिसरातल्या रस्त्याच्या खड्ड्यात पडून ती गंभीररित्या जखमी झालीय. त्यांच्या पायाला फॅक्चर झालं असून ती पुढील चार महिने चालू देखील शकत नाही. आता या वाढत्या घटनांना जबाबदार कोण असा संतप्त सवाल वसईकरांना पडलाय.

या वाढत्या घटनांना आळा बसविण्यासाठी पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतचं पावलं उचलत नसल्याचं दिसतय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 09:32


comments powered by Disqus