मुलीच्या लग्नात अडचणींवर जाणून घ्या हे उपाय, Astro news about girl marriage problem

मुलीच्या लग्नात अडचणींवर जाणून घ्या हे उपाय

मुलीच्या लग्नात अडचणींवर जाणून घ्या हे उपाय
www.24taas.com

ग्रहांच्या प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर काही तोडगे, विधी सांगितले आहेत. ते विधी आपल्या कन्येच्या हातून केल्यास तिच्या विवाहातील अडचणी दूर होतात.

१. महिन्याच्या शुध्द चतुर्थीला चांदीच्या छोट्या वाटीत गायीचे दूध घेऊन त्यात साखर व भात घ्या. चंद्रोदयाच्या वेळी त्यात तुळशीचे पान ठेवून नैवेद्य दाखवा आणि स्वत:भोवती प्रदक्षिणा घाला. 45 दिवस असे केल्यानंतर एका कुमारीकेला भोजन देऊन तिला कपडे, मेंदी दान म्हणून द्यावे. हे व्रत नियमित पूर्ण केल्यास सुयोग्य वराची प्राप्ती होऊन लवकरच विवाह होतो.

२. आठवड्यात गुरूवारी सकाळच्या प्रहरी प्रात:विधी आटोपून पीठामध्ये किंचित हळद मिसळून किमान पाच पोळ्या तयार कराव्यात. प्रत्येक पोळीवर गुळ ठेवावा व गायीला खाऊ घालाव्या. 7 गुरूवार हा विधी नियमित केल्याने तत्काळ विवाह जुळतात.

३. दर मंगळवारी उपवास करावा. देवीच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फूल देवीच्या चरणाशी वाहून पूजन करावे. हे व्रत नऊ मंगळवार करावे. शेवटच्या मंगळवारी त्याचे उद्यापण करावे. या दिवशी नऊ वर्ष वयाच्या कुमारीकाना भोजन, लाल वस्त्र, मेंहदी व दक्षिणा द्यावी.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 29, 2013, 07:52


comments powered by Disqus