गोपीनाथ मुंडे यांना द्या श्रद्धांजली!

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 11:56

भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.

महाराष्ट्राचा जनाधार असलेला नेता हरपला

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 11:57

भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. भाजपसह महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज आणि जनाधार असलेला नेता हरपला, अशा भावना व्यक्त होत आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे कार अपघातानंतर निधन

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 08:19

भाजपचे नेते केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.

उघड्यावर शौचविधी करण्यात भारतीय अव्वल - WHO

Last Updated: Saturday, May 10, 2014, 13:23

आजच्या घडीला जगातील सुमारे एक अब्ज नागरिक उघड्यावर शौचविधी आणि मलमूत्र विसर्जन करीत असल्यानं जागतिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याचं परखड मत जागतिक आरोग्य संघटना आणि ‘युनिसेफ’नं तयार केलेल्या अहवालात व्यक्त केलंय.